२०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील 'पार्कस् रेडियो टेलिस्कोप'ने काही FRB म्हणजेच फास्ट रेडियो बर्स्ट नोंदवले, ज्या अवकाशातल्या सामान्य रेडियो लहरींपेक्षा बऱ्याच वेगळ्या नोंदी होत्या. जगप्रसिद्ध 'WOW' सिग्नलनंतर असं अनेक वर्षांनी झालं असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 'अवकाशीय शिळ' वा 'कॉस्मिक व्हिसल' म्हणवल्या गेलेल्या ह्या शिट्ट्या म्हणजेच उच्च फ्रिक्वेन्सी रेडियो लहरी या फ्लॅश लहरी होत्या व त्या अचानक काही क्षणासाठी नोंदवल्या गेल्या. प्रकाशाचा बीम अथवा किरणे प्रकाशस्रोत अथवा लाईट चालू केल्यावर ज्याप्रमाणे प्रक्षेपित होतो व जणू स्वीच बंद केल्यावर जसा बंद होतो त्याचप्रमाणे या रेडियो लहरी होत्या.
 |
फास्ट रेडियो बर्स्ट नोंद |
मात्र, या लहरींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता X रे, गॅमा , UV , ऑप्टीकल, रेडियो, असं कुठलच उत्सर्जन त्या दिशेने नोंदवण्यात आलं नाही. त्या लहरींच्या उत्सर्जनाचा स्रोत काय, हे आजपर्यंत एक गूढ आहे. २००७ च्या उत्तरार्धात शोध लागलेल्या या FRB च्या स्रोताबद्दल अजूनपर्यंत काहीच माहिती उपलब्ध होऊ नये हे या कथित प्रगत दुनियेसाठी एक आव्हानच आहे.
No comments:
Post a Comment